पुणे - पिंपरी-चिंचवडमधील ५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची १४ दिवसानंतरची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर त्यांची दुसरी चाचणी देखील निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफने यांनी दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या 3 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पाच कोरोनाग्रस्तांची पहिली चाचणी निगेटिव्ह हेही वाचा...कोरोनाशी लढा: एचआयव्हीसह मलेरियावरील औषधांचा साठा किती? सरकारने मागविली माहिती
पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ३ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे तिघेही दुबईहून पिंपरी-चिंचवड शहरात परतले होते. या तीनपैकी एका तरुणाच्या कुटुंबातील ४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर भोसरी येथील नुतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची १४ दिवसानंतरची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.
थायलंड येथून आलेल्या व्यक्तीची देखील पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे समजताच भोसरी रुग्णालयातून पलायन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून पुन्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या रूग्णांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल रात्री उशिरापर्यंत हातात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.