महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 20, 2020, 9:41 AM IST

ETV Bharat / state

चाकण औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा शिरकाव, पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

चाकण औद्योगिक वसाहतीतील मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी याबद्दलची माहिती दिली. या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण परिसरात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.

first corona patient found in chakan industrial estate
चाकण औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा शिरकाव

पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी याबद्दलची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाकणमधील झित्राईमळा येथे मुंबईवरुन आलेल्या या व्यक्तीला घरातच क्वारंटाईन करण्यात आले होते. यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण परिसरात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, मुंबईवरुन चाकण झित्राईमळा येथे आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने आरोग्य विभागाकडून त्याचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले होते. आता या व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details