महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निगडी येथे गुंडगिरीच्या वर्चस्वातून गुन्हेगाराचा दुसऱ्या गुन्हेगारावर गोळीबार - firing took place due to arguements of two criminals

निगडी परिसरात गुंडगिरीच्या वर्चस्वातून दोन सराईत गुन्हेगारांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. आकाश दोडमनी असे गोळीबारात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

pune firing news
निगडी ओटा स्कीम गोळीबार

By

Published : Nov 26, 2020, 1:36 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरात गुंडगिरीच्या वर्चस्वातून दोन सराईत गुन्हेगारांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी 11.30 च्या सुमारास निगडी परिसरातील ओटा स्कीम येथे घडली आहे. आकाश दोडमनी असे गोळीबारात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर, किरण असे गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात किरण खवळेसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्हेगारांमध्ये वाद झाला अन पिस्तुलातून गोळी झाडली
निगडी परिसरातील ओटा स्कीम येथे गुंडगिरीच्या वादावरून दोन्ही गुन्हेगारांमध्ये भांडण सुरू होते. बुधवारी रात्री 11.30 वाजता ओटा स्कीम येथील अंकुश चौक येथे दोघेही समोरा-समोर आले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि यातूनच किरण खवळे याने आकाश दोडमानी यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. यात आकाश जखमी झाला असून त्याच्या पायात गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच फिर्यादीचा भाऊ रवी हादेखील यात जखमी झाला आहे.
गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने काढला पळ
गोळाबारानंतर आरोपी खवळे हा इतर साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले असून टोळक्याच्या वर्चस्वातून गोळीबार आणि खुनाच्या घटना घडत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details