महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून पुण्यात तरुणावर फायरिंग - बुधवार पेठ,

पुण्याच्या बुधवार पेठेत शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सनी चौधरी (वय १७) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

आरोपी अंबादास अशोक होंडे

By

Published : May 13, 2019, 5:02 PM IST

Updated : May 13, 2019, 6:15 PM IST

पुणे- मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्यांना हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून तिघांनी एकाला मारहाण करत त्याच्यावर एअर गनने फायरिंग केल्याची घटना घडली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याच्या बुधवार पेठेत शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी सनी चौधरी (वय १७) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अंबादास अशोक होंडे (वय २८) याला अटक केली तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. आरोपी अंबादास होंडे हा अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

घटनेविषयी माहिती सांगताना पोलीस अधिकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे फिर्यादी घरी जात असताना एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यातील एकाने फिर्यादीला प्यासा हॉटेल कोठे आहे, याची विचारणा केली. त्याने आधी मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र, नंतर त्याने प्यासा हॉटेल कोठे आहे हे दाखविले. याचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ व हाताने मारहाण करण्यात आली. तर एकाने एअर पिस्तूल काढून त्याच्या पायावर फायरिंग केले. यामध्ये त्याच्या उजव्या व डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे.

सीसीटीव्हीद्वारे उघडकीस आला प्रकार

कुटुंबीयांना हा प्रकार कळेल म्हणून फिर्यादी सुरुवातीला पोलिसांना वेगळीच माहिती देत होता. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता तो त्यांच्यासोबत फिरताना, त्यांच्या गाडीत बसताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने खरा प्रकार सांगितला.

Last Updated : May 13, 2019, 6:15 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details