पुणे : सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असून काल एकाच दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात (bursting of firecrackers on occassion of diwali) आली. या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी दुचाकी जळाल्या, तर काही ठिकाणी दुकानाला आग लागल्याचा घटना (Fire Incidents on occassion of diwali) घडल्या. तर काही ठिकाणी घराला आग लागून सर्वच साहित्य जळाले आहे. शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने अनेक ठिकाणी आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान :गेल्या काही वर्षापासून सातत्याने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच फटाके मुक्त दिवाळीसाठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते. पण असे असले तरी या फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहे. कालच्या फटाक्यांच्या आतिषबाजीने जरी एखादी दुर्दैवी घटना घडली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर या आगीच्या घटनेमुळे नुकसान झाले (Fire incidents and Heavy damage) आहे.
आगीच्या घटना :१) वेळ 07 वाजून 55 मिनिटांनी फटाक्यांच्या आतिषबाजी ने जनता वसाहत गल्ली क्रमांक ४७ येथे झाडाला आग लागल्याची घटना घडली.२) वेळ 08 वाजून 23 मिनिटांनी -काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक येथे फटक्याने गॅलरीमधे आग लागल्याची घटना. ३) वेळ 08 वाजून 30 मिनिटांनी बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह येथे फटाक्यांनी एका सोसायटीत आग लागल्याची घटना घडली यात 7 दुचाकी जळून खाक.४) वेळ 08 वाजून 44 मिनिटांनी नरहे येथील मानाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग लागल्याची घटना घडली. ५) वेळ 08 वाजून 48 मिनिटांनी विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ फटक्याने झाडाला आग लागल्याची घटना. ६) वेळ 08 वाजून 51 मिनिटांनी -वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत फटक्याने एका बंद घरामधे आग लागल्याची घटना घडली. यात मोठे नुकसान झाले आहे.७) वेळ 09 वाजून 16 मिनिटांनी सिहंगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत फटाक्यांनी नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना. ८) वेळ 09 वाजून 40 मिनिटांनी गुरुवार पेठ, शितळादेवी चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजीने एक जुन्या वाड्यामधे आग लागल्याची घटना घडली. ९) वेळ 09 वाजून 46 मिनिटांनी - लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटीत फटाक्यांच्या आतिषबाजी ने आग लागल्याची घटना घडली.
या ठिकाणीही आगीच्या घटना१०) वेळ 09 वाजून 55 मिनिटांनी -वडगाव शेरी, टेम्पो चौक येथे एका झाडाला आग लागल्याची घटना घडली आहे. ११) वेळ 10 वाजून 03 मिनिटांनी खडक पोलिस स्टेशन, लाकडी गणपती जवळ एका घरातील गॅलरीमधे आग लागल्याची घटना. १२) वेळ 10 वाजून 29 मिनिटांनी औंध, डिपी रस्ता, इंडियन बँकेजवळ, टेरेजा सोसायटी मधील एका घरामधे आग लागल्याची घटना घडली. १३) वेळ 10 वाजून 31 मिनिटांनी - सिहंगड रस्ता, संतोष हॉलमागे नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. १४) वेळ 10 वाजून 42 मिनिटांनी बालेवाडी, दत्तमंदिरा जवळ एका दुकानामधून धूर लागल्याची घटना. १५) वेळ 10 वाजून 44 मिनिटांनी - शनिवार पेठ, नाना नानी पार्क येथे कचरयाला आग लागल्याची घटना. १६) वेळ 11 वाजून 44 मिनिटांनी भांडारकर इन्स्टीट्युट जवळ फटक्याने बुलेट गाडीला आग लागल्याची घटना घडली. १७) वेळ 11 वाजून 55 मिनिटांनी बुधवार पेठ, तपकीर गल्ली येथे एका दुकानामधे आग लागल्याची घटना घडली (Fire Incidents In Pune) आहे.