महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 30, 2020, 8:58 AM IST

Updated : Mar 30, 2020, 9:57 AM IST

ETV Bharat / state

राजगुरुनगरच्या चांडोलीमध्ये आग लागल्याने भंगार गोदाम जळून खाक

राजगुरुनगरजवळील चांडोली येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास भंगारच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली. यामध्ये गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

fire broke out in warehouse in rajgurunagar pune
राजगुरुनगरच्या चांडोलीमध्ये आग लागल्याने भंगार गोदाम जळून खाक

पूणे- राजगुरुनगरजवळील चांडोली येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास भंगारच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली. यामध्ये गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

राजगुरुनगरच्या चांडोलीमध्ये आग लागल्याने भंगार गोदाम जळून खाक

या घटनेत भंगार जळाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे भंगार गोदाम बंद होते. गोदामावर गेलेल्या विद्युत वाहिनीवरील पक्ष्यांमुळे शॉटसर्किट होऊन गोदामात आग लागली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगदी काहीच वेळातच धुराच्या लोटासह आग वाढली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details