पुणे : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट येथे लाकडाचे सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अद्याप आग अजून धुमसत आहे, गोडाऊन शेजारी असलेल्या चार घरांनाही या आगीची झळ पोहचली आहे. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. टिंबर मार्केटला आग वस्तीमध्ये आणि शेजारील शाळेमध्ये अधिक पसरू नये, यासाठी जवानांनी तत्परतेने घरांमधील सुमारे १०सिलेंडर बाहेर काढले आहेत. दरम्यान आग अजून धुमसूत असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fire broke out timber market : टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; 5 ते 6 लाकडाचे गोडाऊन जळून खाक - पुण्यातील टिंबर मार्केटला आग
पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट येथे लाकडाचे सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. टिंबर मार्केटला आग वस्तीमध्ये आणि शेजारील शाळेमध्ये अधिक पसरू नये, यासाठी जवानांनी तत्परतेने घरांमधील सुमारे १०सिलेंडर बाहेर काढले आहेत. दरम्यान आग अजून धुमसूत असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे.
टिंबर मार्केटमधील गोडाऊनला आग : अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजून 14 मिनिटांनी अग्निशामक दलाच्या जवानांना टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोडाऊनला आग लागल्याची बातमी मिळाली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाचे २० अधिकारी आणि जवळपास १०० जवान घटनास्थळी दाखल झाले. पुणे मनपा, पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड येथील अग्निशमन दलही येथे दाखल झाले. एकूण जवळपास ३० अग्निशमन दलाची वाहने आणि खासगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. दरम्यान या आगीच्या भक्ष्यस्थानी चार ते पाच लाकडाचे गोडाऊन जळून खाक झाले आहेत. गोडाऊनच्या शेजारी असलेल्या घरांनादेखील आगीने आपल्या विळख्यात घेतले आहे. या गोडाऊन शेजारी शाळादेखील आहे, आगीमुळे शाळेचेही नुकसान झाले आहे. परंतु यात सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही. पण दुकानदारांचे आणि स्थानिक नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी आणि जवळपास १०० जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे मनपा, पुणे कॅन्टोमेंट, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवडचे अग्निशमन दल देखील येथे दाखल झाले आहेत.
हेही वाचा -