महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2020, 11:00 PM IST

Updated : Nov 24, 2020, 1:22 AM IST

ETV Bharat / state

लोहिया नगर परिसरात आग, दहा घरे जळाल्याची प्राथमिक माहिती

लोहिया नगर परिसरात भीषण आग लागली आहे. आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नांनंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे -येथील लोहिया नगर परिसरात भीषण आग लागली होती. त्यामुळे आसपासची 10 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. अग्निशमन दलाच्या आठ ते दहा ग्या घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

आगिवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान

सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठ येथील लोहियानगर झोपडपट्टीत ही आगीची घटना घडली. एका सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यानंतर सुमारे 10 घरे जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहेत. यात एक जखमी असून आता आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचे (थंड) काम करत आहेत.

Last Updated : Nov 24, 2020, 1:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details