पुणे- जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावात श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी मनोरूग्ण,बेघर,निराधार लोकांसाठी करणा-या अक्षय बो-हाडे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता.अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने सोशल मीडियावर फेसबूक लाईव्हवरुन मारहाणीची माहिती दिली होती. या प्रकरणी सत्यशील शेरकरवर गुन्हा दाखल झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात अक्षय बो-हाडे हा तरुण मनोरूग्णांसाठी काम करतो. त्याच्या कामाचे कौतुक सर्वत्र केले जात असताना श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी अक्षय बो-हाडेला घरी बोलावून घेऊन मारहाण केल्याचा आरोप सोशल मीडियातुन केला होता. याबाबत गुरुवारी रात्री अक्षय बो-हाडे याच्या तक्रारीवरून जुन्नर पोलीसांत भा.दं.वि.क 323/324/504/506 व आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे सत्यशील शेरकर वर गुन्हा दाखल झाला आहे.
उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, निलेश राणे यांनी मारहानीचा निषेध करत अक्षय बो-हाडे याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले होते.