पुणे - सासरच्या व्यक्तीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
हे वाचलं का? -समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांना घातपाताचा संशय
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरचे मंडळी लग्नानंतर काही महिन्यांनी घरगुती कामाचे कारण देत २७ वर्षीय विवाहित महिलेचा छळ करत होते. त्यानंतर तिला पतीकडून मारहाण देखील होऊ लागली. तसेच तो तिला अश्लील शिवीगाळ देखील करत होता. एवढेच नाहीतर सासू, सासरे आणि दिराकडून देखील वेगळी वागणूक मिळत होती. सर्वांनी तिचा मानसिक, शारीरिक छळ करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. त्यामुळे तिने जाचाला कंटाळून संबंधित विवाहित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.