पुणे- शहरातील पिंपरी-चिंचवड भागात आज दोन ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सकाळी सातच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील नॅचरल गॅसची गळती होऊन भीषण आग लागली. तर दुसऱ्या घटनेत दुपारी एकच्या सुमारास सात ते आठ पुठ्ठ्यांच्या आणि भंगराच्या गोदामाला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुसऱ्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी भीषण आग ; लाखोंचे नुकसान - औद्योगिक
भोसरी एमआयडीसी कंपनीच्या आत मध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सातच्या सुमारास नॅचरल गॅस गळती होऊन भीषण आग लागली.
भोसरी एमआयडीसी कंपनीच्या आतमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सातच्या सुमारास नॅचरल गॅस गळती होऊन भीषण आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब व भोसरी उपकेंद्राचे एक बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्वरित एमएनजीएल कंपनीला दिली. एमएनजीएल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी इनलेट गॅस बंद केला. आणि आग आटोक्यात आणली. सदर परिसर औद्योगिक असल्याने जवळपास लोकवस्ती नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली व सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत चिखली कुदळवाडी येथे ७ ते ८ पुठ्य़ाच्या आणि भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली. अद्याप, आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. घटनास्थळी तब्बल १४ खासगी टँकर आणि महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले आहे. घटनेत लाखो रुपयांच नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.