पुणे(पिंपरी-चिंचवड) - शहरात दोन तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकाला अज्ञात महिलेने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिमुकलीला महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले स्त्री जातीचे जिवंत अर्भक - wakad police station
पिंपरी-चिंचवड शहरात दोन तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकाला अज्ञात महिलेने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन तासांपूर्वी जन्म घेतलेले स्त्री जातीचे अर्भक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला दिसले. तेव्हा, याची माहिती वाकड पोलीस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, तातडीने त्या अर्भकाला महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. चिमुकलीचे प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, अज्ञात महिलेने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आपल्या पोटच्या मुलीला असे का फेकून दिले? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांना देखील पडला आहे.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी महिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.