बारामती - अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर ( Ajit Pawar on Baramati Tour ) आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील काटेवाडी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका शेतकऱ्याने अजित पवार यांच्या थेट प्रांतधिकारी पैस मागत असल्याची तक्रार ( Farmers complained to Ajit Pawar ) केली.
बारामतीत दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बोलत असताना एका शेतकऱ्याने प्रांताधिकार्यांनी भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाहीत. मुद्दाम अडथळे आणले. आम्हाला पाच लाख रुपये मागितले, असा गंभीर आरोप केला. अचानक झालेल्या या आरोपांमुळे सभा स्तब्ध झाली. व्यासपीठा लगतच उभे असणाऱ्या प्रांताधिकार्यांनी संबंधित क्षेत्रातील वाटपच अद्याप झालेले नाही, भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी पवार यांच्याकडे लागलीच दिले.