महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... म्हणून केला शेतकऱ्याने तहसीलदार कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न - तहसीलदार

मालकीच्या जागेवर अन्य व्यक्तींनी अतिक्रमण केला होता. त्याबाबत तक्रार अर्ज देऊनही दखल घेतली जात नसल्याने गुळाणी येथील भगवान गुळाणकर या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Mar 16, 2020, 5:15 PM IST

पुणे- तहसीलदार कार्यालयात अतिक्रमणाबाबत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने गुळाणी (ता. खेड) येथील एका शेतकऱ्याने तहसीलदार कार्यालयातच विषारी औषघ घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. भगवान विठ्ठल गुळाणकर, असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

माहिती देताना वैद्यकिय अधिकारी

गुळाणी येथे भगवान गुळाणकर यांची मालकी असलेल्या जागेत गावातील काही लोकांनी बांधकाम व अतिक्रमण केले होते. याबाबत गुळाणकर यांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीचे वेळेवर निरसन होत नसल्याची भगवान हे निराश झाले होते. यातूनचे त्यांनी आज तहसील कार्यालय येथे विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर राजगुरुनगर येथील एका खासगी उपचार सुरु आहे. भगवान गुळाणकर यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्याचे डॉ. दिलीप बांबळे यांनी सांगितले.

गुळाणकर यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत 26 ऑगस्ट, 2019 व 6 मार्च, 2020 अशा दोन वेळा तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या संदर्भानुसार तहसीलदार सुचित्रा आमले यांनी याबाबत मंडलाधिकारी कनेरसर यांना दिनांक 6 मार्च, 2020 रोजी स्थळ पहाणी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालावर उद्या (मंगळवार) उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र, आज तक्रारदार यांनी थेट तहसीलदार कार्यालयात येऊन आपल्या अर्जाचा विचार केला जात नाही, या निराशेतून विषारी औषध प्राशन केले. यावेळी राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी व पोलीस कर्मचाऱ्यांनी भगवान गुळाणकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तुळशीबाग 3 दिवस बंद

ABOUT THE AUTHOR

...view details