पुणे -पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांसाठी पुण्यातील वानवडी येथे भव्य थ्रीडी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध रांगोळीकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सोमनाथ भोंगळे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात थ्रीडी रांगोळीच्या माध्यमातून विविध चित्रे रेखाटण्यात आली.
आषाढी वारी : 3D रांगोळीच्या रुपात 'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याने साकारली वारीतील क्षणचित्रे
पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी प्रसिद्ध रांगोळीकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सोमनाथ भोंगळे यांनी भव्य थ्रीडी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात थ्रीडी रांगोळीच्या माध्यमातून विविध चित्रे रेखाटण्यात आली.
आळंदी ते पंढरपूरपर्यंत सुरू झालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या विविध भावमुद्रा थ्रीडी रांगोळीतून साकारण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात विठ्ठलाच्या गंधाची रांगोळी काढण्यात आली असून त्यात वारकऱ्यांचे भावरूपी चित्र उमटले आहे. तसेच विठ्ठलासमोर अभिनेते अमिताभ बच्चन यांचे हात जोडलेले चित्र, वारीतील लहान मुलांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा, माऊलीचे अश्व पळतानाचे चित्र व त्यासारखीच विविध चित्रे थ्रीडी रांगोळीतून रेखाटण्यात आली.
थ्रीडी रांगोळी काढताना यामध्ये लेक व पिगमेंट रंगाचा वापर करण्यात आला. पांढऱ्या रांगोळीला घासून हे रंग एकत्र करून या रांगोळ्या काढण्यात आल्या.