महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीतील 'तो' चोरीचा प्रकार बनाव - बारामती पोलीस बातमी

कपाटातील साडेसहा लाख रोकड, दीड लाखाचे दागिने असा आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांना दिला. ही रक्कम घेत दोघे पसार झाले.पोलिसांना सुरुवातीपासूनच यात काळेबेरे असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी कसून चौकशीला सुरुवात केल्यावर पुढे आलेले सत्य चक्रावून सोडणारे होते आहे.

बारामती पोलीस
बारामती पोलीस

By

Published : Mar 16, 2021, 5:31 PM IST

बारामती(पुणे)- बारामती येथे काही दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्याला चाकू लावून भर दुपारी आठ लाखांची चोरी झाली होती. या घटनेच्या तपासानंतर तक्रारदारानेच हा चोरीचा बनावट प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी निरावागज येथील लखन गोपाळ भोसले (वय ३०) याला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. रविवारी दुपारी तक्रारदार घरात झोपली असताना दोघे घरात आले. त्यांनी पैसे कुठे ठेवले आहेत, पैसे दे अशी विचारणा केली. तक्रारीदारीची सून खोलीममधून बाहेर आली असताना त्यातील एकाने तिच्या गळ्याला सुरा लावला.घरातील दागिने, पैसे दे नाही तर तुझ्या सूनेला जीवे मारेल. अशी धमकी दिली. तक्रारीदने कपाटातील साडेसहा लाख रोकड, दीड लाखाचे दागिने असा आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांना दिला. ही रक्कम घेत दोघे पसार झाले.पोलिसांना सुरुवातीपासूनच यात काळेबेरे असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी कसून चौकशीला सुरुवात केल्यावर पुढे आलेले सत्य चक्रावून सोडणारे होते आहे. यात तक्रारदारीनेच एका युवकांच्या मदतीने चोरीचा हा प्रकार घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मिळवल्यावर एका विशिष्ट क्रमांकावर तिने अनेक कॉल केल्याचे लक्षात आले. बारामती येथील निरावागज मधून या युवकाला अटक केल्यानंतर खरी घटना समोर आली आहे. तक्रारीदारीनेच रोकड व दागिन्यांवर कब्जा मिळविण्यासाठी हा सगळा बनाव घडून आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-गंगापूरात अवैध दारूचा साठा जप्त; गंगापूर पोलिसांची धडक कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details