फडवणीस मॅच्युअर राजकारणी, चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य पुणे : कसबा पोटनिवडणूक विधानसभेच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीने आज एक महाबैठक घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीचा तपशील सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ही निवडणूक आधी २७ रोजी होती आता ती रविवार २६ रोजी होणार आहे. पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. नगरसेवकांकडे मी जाऊन आलो. आज आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली पण ती महाबैठक झाली.
माधुरीताईमुरलेल्या राजकारणी : पोट निवडणूक बिनविरोध व्हावी भाजपाने त्यांचा उमेदवार सांगावा असे विरोधक म्हणत आहेत. त्यावर विरोधकांनी सांगावे की, तुम्ही एक उमेदवार द्या आणि बिनविरोध निवडून आणू. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चिंचवड पोट निवडणुकीसाठी महेश लांडगे यांची राजकीय रणनीतीकार म्हणून निवड झाली आहे. तर माधुरीताई मिसाळ या कसबा विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय काम करतील. त्यांना आम्ही सांगितले आहे की, तुम्ही प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना नेत्यांना पत्र लिहा, भेटी घ्या आणि बिनविरोधसाठी विनंती करा. चिंचवड पोटनिवडणूकसाठी महेश लांडगे राजकीय रणनीतीसाठी गेले आहेत. कसबामध्ये माधुरी ताई आहेत हे दोघे ही सगळ्यांना भेटून इतर सगळ्या पक्षांना भेटतील.
एकदाही राष्ट्रपती राजवट नाही :आज तिघांची लिस्ट दिल्लीकडे जाईल आणि त्यानंतर १, २ तारखेला उमेदवार जाहीर होऊ शकते. मोदी यांच्या काळात २०१४ पासून एकदा ही देशात राष्ट्रपती राजवट लागली नाही. काँग्रेसच्या काळात तब्बल 19 वेळा राष्ट्रपती राजवट लागली हेती. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या विधानसभा बरखास्त करून काँग्रेसने हे काम केले. परंतु मोदी आल्यापासून कधीही राष्ट्रपती राजवट व कुठल्याही राज्यात लोकशाहीने निवडून आलेले सरकार उलटवून लावलेली नाही. त्यामुळे आम्ही मोदींचे वारस असल्यामुळे कोण काय बोलतो ते बघितले नाही.
चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद : कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांची उपस्थिती होती. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.
हेही वाचा : chandrakant patil Reaction उशिराच्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो चंद्रकांत पाटलांची जयंत पाटलांवर टीका