बागेश्वर बाबांच्या सत्संगात देवेंद्र फडणवीस पुणे Fadnavis On Bageshwar Baba:सनातन धर्म म्हणजे रुढी, परंपरा आणि जातीवाद असा संभ्रम पसरवला जात आहे; परंतु सनातन धर्म म्हणजे अनादी आणि अनंत आहे, हे लोकांना सांगण्याचं काम हिंदू धर्माचं आहे. तोच धर्म भारताचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) पुण्यात बागेश्वर बाबा यांचं दर्शन घेऊन सत्संगाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Fadnavis present in Bageshwar Baba Satsang)
राम मंदिर आपल्यासाठी अभिमानाची बाब :भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारीला एक मोठा इतिहास रचला जाणार आहे. ज्यामध्ये अयोध्येत भव्य अशा राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी रामलल्ला यांचा जन्म झाला. त्याठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलं आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. बागेश्वर बाबा अखंड भारतामध्ये हिंदुत्वाची जनजागृती करत आहेत. त्यामुळे त्यांचंही मी महाराष्ट्रात स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. अखंड भारतात हिंदुत्वाचा असाच जागर करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे.
फडणवीसांबद्दल विशेष प्रेम :पुण्यात आज बागेश्वर बाबा यांच्या दरबारामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली आहे. यावेळी बागेश्वर बाबा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विशेष प्रेम व्यक्त करतो. ते कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत किंवा मंत्री आहेत म्हणून नाही तर ते श्रीरामाचे आहेत आणि श्रीराम आम्हा सर्वांच्या आहेत. त्यामुळे ते आम्हाला प्रिय आहेत अशी प्रतिक्रिया बागेश्वर बाबा यांनी यावेळेस दिली आहे.
सत्संगाचा आज तिसरा दिवस :पुण्यातील संगमवाडी भागात बागेश्वर बाबांचा सत्संग दरबार भरला आहे. आज सत्संग दरबाराचा तिसरा दिवस आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सत्संग आयोजित केला असून काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली होती. आज स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हजरी लावून बाबांचं दर्शन घेतलं आहे.
हेही वाचा:
- धीरेंद्र शास्त्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी; म्हणाले, 'शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील हिंदू राष्ट्र व्हावं'
- बागेश्वर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, अंनिसच्या प्रश्नावर म्हणाले, हनुमानजींच्या नावावर चमत्कार झाला तर रोखू शकत नाही
- धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध; अजित पवार गट, अंनिस मैदानात