पुणे :मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजप व कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता माजी सैनिक सुद्धा निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. माजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माजी सैनिक तुकाराम नामदेव डफळ निवडणूक लढवणार आहेत. आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
माजी सैनिकांचे प्रतिनिधी : भारत मातेच्या प्रेमापोटी आणि सैनिकांचे बलिदान आणि योगदान मोठे आहे. सैनिकांकडून विधानसभेत असे नेतृत्व जावो यासाठी आम्ही हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्यामुळे असे चांगले माणसे विधानसभेत पोहोचणे गरजेचे असल्याचे यावेळी माजी सैनिकांनी सांगितले.
माजी सैनिकांना संधी मिळाली पाहिजे : उमेदवारी अर्ज दाखल करताना कारगिल योद्धा व १८८९ मिसाईल रेजिमेंटचे दीपचंद नायक सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, सध्या बदला युग आहे आणि जनतेला बदल हवा आहे. सैनिकांनादेखील जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानभवनात संधी मिळाली पाहिजे. सैनिकांवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. याला अपवाद म्हणून काही जण असू शकतात. पण प्रामाणिक असलेल्या सैनिकांना देशाच्या कल्याणासाठी संधी मिळाली पाहिजे. यामुळे नामदेव डफळ यांचा सैनिक समाज पार्टीकडून ही उमेदवारी भरण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले.