पुणे : पुणे महापालिका येथील बाहेरील बाजूस बहात्तर वर्षांचे बबनराव भाऊसाहेब डोंगरे रस्त्याने पायी निघाले होते. ( Even while on duty police saved life ) त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यावरच कोसळले. डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले आणि रक्त येऊ लागले. (saved life of senior citizen ) त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. कोणीही हात लावायला तयार नव्हत. याचवेळी तेथून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये ( SubInspector of Police Suresh Jaibhaye ) यांनी गर्दीत जाऊन त्या वृद्धावर प्राथमिक उपचार करून तत्काळ दवाखान्यात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतरच ते परत कोर्टात हजर झाले. एकीकडे कोर्टात आरोपीचे रिमांड घेणे महत्त्वाचे असताना देखील रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकाची (Senior citizens ) अवस्था पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले.
नागरिकांची मोठी गर्दी जमली :ज्येष्ठ नागरिक डोंगरे हे मूळचे फुगेवाडी भोसरी येथील राहणारे असून खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून सेवानिवृत्त (Retired from Ammunition Factory ) झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कामानिमित्त महापालिकेच्या परिसरात आले होते. तेथून रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते रस्त्यावरच कोसळले. बेशुद्ध पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येऊ लागले. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परंतु, कोणी पुढे येईना. त्यांनी गर्दीत जाऊन पाहिले तेव्हा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले.