महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयएनएस शिवाजीमध्ये आण्विक प्रशिक्षण केंद्राची स्थापना - nuclear

भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी महाविद्यालयांमध्ये आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण केंद्राची (एनबीसीटीएफ) स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन अॅडमिरल सुनील लांबा यांच्याहस्ते २५ मार्चला होणार आहे.

सौजन्य - सोशल मीडिया

By

Published : Mar 24, 2019, 2:10 PM IST

पुणे - भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी महाविद्यालयांमध्ये आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण केंद्राची (एनबीसीटीएफ) स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन अॅडमिरल सुनील लांबा यांच्याहस्ते २५ मार्चला होणार आहे.

आयएनएस शिवाजी हे भारतीय नौदलाचे अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षण देण्यात येते.


दरम्यान, महाविद्यालयाच्या वतीने प्रशिक्षणार्थींना आण्विक, जैविक आणि रासायनिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी एनबीसीटीएफची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमानंतर हे केंद्र प्रशिक्षणासाठी खुले करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details