पुणे -गेल्या काही वर्षांमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसची संख्या वाढवण्याची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. नुकतेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्याला इलेक्ट्रिक बस प्रदान करण्यात आल्या. या बस मंगळवारी प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाल्या.
पुणेकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक बस, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्याला इलेक्ट्रिक बस प्रदान करण्यात आल्या असून प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयाच्या वतीने पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून या इलेक्ट्रिक बसचा वापर पुण्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक बसच्या तिकिटासंदर्भात प्रवाशांमध्ये अद्यापही संभ्रम कायम आहे. मात्र, सध्या तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने नियमित दर पत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.