पुणे :गेल्या दोन तीन आठवड्यापासून चीनसह अन्य काही देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाने गर्दीच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना केल्या आहेत. याच धरतीवर ही मागणी वाढली असल्याचे दिसत आहे.
Fear of Corona : चीनमधील कोरोनाच्या भीतीने पुण्यात, मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत वाढ - number of patients is increasing
जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर पुण्यात देखील मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत सुमारे 40 ते 50 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच नागरिक आपल्या बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी झाला तशी मास्क वापरण्याची संख्या देखील कमी झाली.
रुग्णांची संख्या वाढत आहे : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढती थंडी, हवेमध्ये पसरलेले धुलीकरण, प्रदूषण यामुळे श्वसनाचे, फुफुसाचे विकार होणाऱ्या रुग्णांची संख्या (number of patients is increasing) वाढत आहे. त्यामुळे बाहेर फिरताना या विकारांपासून बचाव करण्यासाठी देखील मास्कचा वापर करत आहेत. असे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी सदस्य डॉक्टर भरत कदम म्हणाले आहेत.
कोरोना निर्बंधाचे पालन करावे :कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सॅनिटायझर आणि मास्कची मागणी 15 ते 20 टक्क्यांवर आली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या मागणीमध्ये दुप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना निर्बंधाचे पालन करावे (Corona restrictions should be followed) असे देखील डॉक्टर भरत कदम म्हणाले आहेत.