लोणावळा (पुणे) - लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने शूट केल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी लोणावळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून ड्रोन चालक व्यंकटेश तेजस बोपन्ना (वय- 26) याला अटक करण्यात आली होती. त्याची जामिनीवर सुटका झाली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.
लोणावळ्यातील INS शिवाजी परिसरात ड्रोनने शूटिंग; पोलिसांनी ड्रोन चालकाला ठोकल्या बेड्या - आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन
लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने शूट केल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी लोणावळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून ड्रोन चालक व्यंकटेश तेजस बोपन्ना (वय- 26) याला अटक करण्यात आली होती. त्याची जामिनीवर सुटका झाली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावल्यामधील आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात ड्रोनद्वारे शूट करत असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली. आयएनएस शिवाजीच्या मेन गेटवर तसेच एअरफोर्स च्या परिसरात शूट होत असल्याने तिथे कार्यरत असलेल्या कर्मचारी अलोक मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. ड्रोन चालक हा बाहेर थांबला असल्याचे दिसल्याने त्याच्या दिशेने जात असताना व्यंकटेश हा मोटारीमधून पळून गेला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी काही तासात त्याला अटक करून कारवाई केली आहे. दरम्यान, नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं असून कोणीही विनापरवाना ड्रोनद्वारे शूटिंग करू नये ते बेकायदेशीर आहे. अस केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अस लोणावळा पोलिसांनी म्हटले आहे.