पुणे - लॉकडाऊनची सरकारला, प्रशासनाला आणि नागरिकांना सवय नाही. त्यामुळे सध्या एकमेकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून एवढे तरी प्रत्येकाने करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
स्वयंशिस्त आणि प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. हिरोगिरी रस्त्यावर फिरण्यात नाही तर स्वयंशिस्तीने घरी राहण्यात आहे. घरात राहणे, रुग्णालयामध्ये राहणे आणि भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये राहणे हे तीन पर्याय आपल्या जवळ आहेत. मात्र, आपण पहिला पर्याय निवडू, असे भावनिक आवाहन त्यांनी नागरिकांना केले.