पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे. यामध्ये टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी बेभान होऊन, नाचत आहेत.
ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज - Dnyneshwar maharaj
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे.
इंद्रायणी काठी वारकरी हरिनामाच्या गजरात दंग झाले आहेत. काहीच वेळात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होऊन मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गांधीवाड्यात मुक्काम होणार आहे. प्रस्तानाअगोदर आषाढीवारी सोहळ्यातील मानाच्या 22 दिंड्या या माऊलींना सलामी देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. माऊलींच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांबरोबर पोलीसही भक्तिमय वातावरणात दंग झाले आहेत. तेही वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून आपला वारी सोहळ्यातील आनंद घेत आहेत. त्यामुळे माऊलींचा सोहळा प्रत्येक माणसासाठी एक वेगळीच ऊर्जा देऊन जाणारा असतो.