पुणे - कसबा आणि सोमवार पेठ परिसरामध्ये टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपींचा तपास सुरू करण्यात आला आहे.
कसबा पेठ परिसरात टोळक्याकडून १३ वाहनांची तोडफोड - unknown person
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही तरुणांनी शस्त्राच्या मदतीने सोमवार पेठ परिसरात ११ आणि कसबा पेठ परिसरात २ वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील आरोपींची ओळख आणि तोडफोड करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
कसबा पेठ परिसरात टोळक्याकडून १३ वाहनांची तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही तरुणांनी शस्त्राच्या मदतीने सोमवार पेठ परिसरात ११ आणि कसबा पेठ परिसरात २ वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील आरोपींची ओळख आणि तोडफोड करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे अधिक तपास करत आहेत.