पुणे -निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा शुभेच्छा माझ्या विरोधी उमेदवार पंकजा ताई मुंडे यांनी दिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही ही त्या मला ऐकायला मिळाल्या नाहीत. मात्र, त्यांनी शुभेच्छा दिल्याचे माध्यमांकडून पाहिले, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. त्यांनी शुभेच्छा दिल्या याचा मनापासून आनंद झाला आहे. पवित्र अशा गहिनीनाथ गडावर शुभेच्छा देण्याची त्यांना सद्बुद्धी मिळाली, असा खोचक टोलाही मंत्री धंनजय मुंडे यांनी लगावला.
'पंकजाताईंनी शुभेच्छा दिल्या त्याचा मनापासून आनंद' मंत्री मुंडे हे पिंपरी-चिंचवड येथे जाहीर आभार मेळाव्या निमित्त रावेत येथे आले होते. मराठवाडा येथील लाखो नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. धंनजय मुंडे यांचा आभार मेळाव्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट; 'त्या' मुलाची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली दखल
पुढे बोलताना मुंडे म्हणाले, की विधानसभेच्या या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच शुभेच्छा माझ्या विरोधी उमेदवार पंकजा ताई मुंडे यांनी दिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या काही शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. काल ही त्या मला ऐकायला मिळाल्या नाहीत. मात्र, मी माध्यमांकडून मला ते माहित झाले. मनापासून शुभेच्छा दिल्याचा आनंद आहे. उशिरा का होईना, वामनभाऊ यांचे वास्तव्य आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गहिनीनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली, असा टोलाही त्यांनी लगावला.
मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. त्या शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्यासाठी प्रेरणा देत राहतील. शुभेच्छा दिल्यात त्या आनंदाने स्वीकारल्या आहेत. मी धन्यवाद देखील मानले आहेत. त्या शुभेच्छा जनसेवेच्या सत्कार्यासाठी कामी येतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल'