महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांचं बारामती कनेक्शन - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

महाविद्यालयामध्ये बीएमसीसीचा कट्टा, रुपालीचा कट्टा आणि वैशालीच्या कट्ट्यावर थांबत होतो. पण फक्त चहा आणि वडापाव खायला. तुम्ही दुसरा अर्थ मनात ठेवू नका, असे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी अचानक उपस्थितांच्या शिट्ट्या पडल्या. त्यानंतर त्यांनी बारामती वसतिगृहाबद्दल सांगितले.

baramati connection
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

By

Published : Jan 20, 2020, 5:48 PM IST

पुणे -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांचे बारामती कनेक्शन सांगितले. माझे ८० टक्के मित्र बारामती वसतिगृहामध्ये राहत होते. त्यांच्या प्रेमापोटी माझी मेस देखील त्याच वसतिगृहामध्ये होती. त्यामुळे नाते कसे आणि कुठे जुळेल हे सांगता येत नाही, असे मुंडे म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

...अन् धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांचं बारामती कनेक्शन

महाविद्यालयामध्ये बीएमसीसीचा कट्टा, रुपालीचा कट्टा आणि वैशालीच्या कट्ट्यावर थांबत होतो. पण फक्त चहा आणि वडापाव खायला. तुम्ही दुसरा अर्थ मनात ठेवू नका, असेही ते म्हणाले. यावेळी अचानक उपस्थितांच्या शिट्ट्या पडल्या. त्यानंतर त्यांनी बारामती वसतिगृहाबद्दल सांगितले.

मी समाजकार्यातून सुरुवात केली आणि पाहता पाहता येथे आलो. शरद पवार यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. विभाग कुठला हा माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. यामध्ये न्याय हे नाव आले आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे फार मोठे असून माझ्यासमोरील खूप मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर काम होत नाही म्हणून मला सोशल मीडियावर दीडशे शिव्या देणारे लोक होते. मात्र, मलाही कळतंय रोज शिव्या घालतील पण मनात राग ठेवत नाही. मी त्यांचेही कामे केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते असे पद असते असे माहिती नव्हते. तुम्ही आले तेव्हापासून आम्हाला ते माहिती झाले, असे काहीजण सांगतात. यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात, असे मुंडे म्हणाले. आता देखील माझ्यावर सोपवलेल्या विभागाचे काम मी अत्यंत प्रमाणिकपणे करणार असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details