बारामती - देशासह जागतिक पातळीवर ऊसाचे उत्पादन घटले आहे. आपण साखरेपेक्षा इथेनॉलकडे जास्त वळले पाहिजे. पूर्वी सी.हेव्ही पासून इथेनॉल तयार करायचो. बी.हेव्ही पासून इथेनॉल तयार करतोय. काही कारखाने तर आता ज्यूस टू इथेनॉल अशा पद्धतीने चालले आहेत. ज्यूस टू इथेनॉल, बी.हेव्ही पासून इथेनॉल, सी.हेव्ही पासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे व साखरेचे दर वाढवा अशी केंद्राकडे मागणी केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
इथेनॉलसह साखरेचे दर वाढवण्याची केंद्राकडे मागणी - अजित पवार 'ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना साखरेचे दोन पैसे जास्त मिळावेत'
पुढे पवार म्हणाले की, गतवर्षी साखर निर्यातीसाठी पहिल्यांदा सहाशे रुपये सबसीडी दिली. त्यानंतर चारशे रुपये करण्यात आली. आता सबसिडी काढून टाकली आहे. केंद्र सरकार नेहमीच हा विचार करते की, सव्वाशे कोटीमध्ये ऊस उत्पादन करणारा वर्ग किती? महाराष्ट्र, उत्तरप्रदेश काही प्रमाणात कर्नाटक व तामिळनाडू या चार राज्यात साखर आणि ऊस तयार होतो. मग सव्वाशे कोटीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दहा कोटी लोकांचा संबंध साखर व्यवसायाशी असेल. मात्र ते सव्वाशे कोटीचा विचार करतात हे लक्षात घेतले पाहिजे. असे सांगून महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना साखरेचे दोन पैसे जास्त मिळावेत. यासाठी शरद पवार हे दिल्लीत नेहमीच प्रयत्न करत असतात, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा -....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी