पुणे - भारतीय लष्कराच्यादक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ'पदी लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ' पदी ले. जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती - main
भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालय 'चीफ ऑफ स्टाफ'पदी लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंग आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली
pune
लेफ्टनंट जनरल आहूजा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए)माजी कॅडेट आहेत. त्यांनी सन १९८१ मध्ये बंगाल सॅपर्समधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. त्यांना त्यांच्या सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावरवीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली असून नुकताच त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.