पुणे: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार बाजू मांडली यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट पुढे म्हणाले की, गेली तीन दिवस प्रोनोलॉजी तसेच प्रोसिजरवर बोलले गेले. या तीन दिवसात नवीन कुठलाही मुद्दा मांडला गेलेला नाही. कोर्टाला सर्वांचेच अधिकार काय आहे हे ठरवावे लागणार आहे. गेली कित्येक दिवस जी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लोकशाहीची जी काही संस्था आहे उदा. स्पीकर, राज्यपाल आणि निवडणूक आयोग असेल यावरच लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप दुर्दैवी आहे, असे यावेळी बापट म्हणाले.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद:आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. यावेळी बोलताना, आमदार एखाद्या पक्षात विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो. मुळात सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचे आमदारांकडून उल्लंघन झाले. त्यांनी भाजपा उमेदवाराला मतदान केले, असा प्रतिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून भविष्यातील घडामोडींच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. भविष्यात १०व्या अनुसूचीच्या आधारे देशातील सरकार पाडली जाऊ शकतात. हे लोकशाहीला परवडणारे नाही, असेही उल्हास बापट म्हणाले.