पुणे- पुणे ते मुंबई धावणार्या ऐतिहासिक 'डेक्कन क्वीन' या रेल्वेचा शनिवारी ९० वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने शनिवारी रेल्वे विभाग आणि प्रवासी संघाकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
'डेक्कन क्वीन'चे ९० व्या वर्षात पदार्पण; पुण्यात केक कापून साजरा - केक
'डेक्कन क्वीन' लाच 'दख्खनची राणी' म्हणूनही ओळखले जाते. शनिवारी या रेल्वेला ९० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुणे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वेला सजविण्यात आले. तसेच बँड पथकदेखील वाजविण्यात आले.

दरम्यान, दख्खनच्या राणीला लवकरच अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोडदेखील देण्यात येणार आहे. मात्र, या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या मनात रुतलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग त्या जोडीला लाल पट्टी असे रूप कायम ठेवण्यात येणार आहे.