महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नर : वादळी वाऱ्यात घर कोसळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, वयोवृद्ध महिला गंभीर

आज दुपारच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील ओतुर डुंबरवाडी येथील तेलदरा वस्तीवर वादळी वाऱ्यात घर कोसळून घरातील 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यात घर कोसळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, वयोवृद्ध आजी गंभीर

By

Published : Jun 10, 2019, 11:13 PM IST

पुणे- आज दुपारच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील ओतुर डुंबरवाडी येथील तेलदरा वस्तीवर वादळी वाऱ्यात घर कोसळून घरातील 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवी विलास भुतांबरे, (वय 6) आणि कार्तिक गोरक्ष केदार (वय 2) असे घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर चिमाबाई केदार (वय 70) असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे.

वादळी वाऱ्यात घर कोसळून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, वृद्धा गंभीर

आज दुपारी जोरदार वादळी वारे सुरु होते. त्यावेळी अचानक केदार कुटुंबीयांचे घर कोसळले. त्यावेळी घरात 2 चिमुकले व 1 आजी होती. त्यामुळे या घटनेत 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर वयोवृद्ध आजी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. यातील जखमी आजीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details