पुणे- शिवनेरी किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. टाकाच्या बाजूने शेवाळा आला असल्यामुळे हा व्यक्ती पाय घसरुन टाक्यामध्ये पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवनेरीवर आढळला शिवभक्ताचा मृतदेह, शिवजन्मोत्सवावेळी दूर्घटना घडल्याची शक्यता
मृतदेह 3 दिवस पाण्यात असल्यामुळे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. किल्ले शिवनेरीवर 3 दिवसांपूर्वी शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले होते. त्यावेळी ही अज्ञात व्यक्ती पाण्याच्या टाक्यामध्ये पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
स्थानिक नागरिक व शिवप्रेमींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शिवनेरी गडावरील शिवाईदेवीच्या मंदिराच्या बाजुला असणाऱ्या शिवकालीन पाण्याच्या टाक्यात अंदाजे 3 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्ती पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तीन दिवसानंतर आज (रविवारी)मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
मृतदेह 3 दिवस पाण्यात असल्यामुळे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. किल्ले शिवनेरीवर 3 दिवसांपूर्वी शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले होते. त्यावेळी ही अज्ञात व्यक्ती पाण्याच्या टाक्यामध्ये पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जुन्नर पोलीस या घटनेबाबत पुढील तपास करत आहे.