पुणे :कसबा पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. ही लढाई रासने विरुद्ध धंगेकर असलेल्या असे बोलले जाते. परंतु ही लढाई आता हिंदुत्ववादी विरोधी, राष्ट्र विचारविरोधी, काश्मीर विरोधी लोकांची आहे. त्यामुळे कसब्यात राष्ट्र विचाराने प्रेरित लोक असल्याने ते भाजपाला मतदान करतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गुरूवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे.
हिंदुत्ववादी कसब्याला हरवण्याची जंग :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कसबे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी जोरदार हिंदुत्ववादी भाषण करत ही लढाई हिंदुत्ववादी असल्याचे स्पष्ट केले. गुरूवारी त्यांनी भाषणाची सुरुवात 'महादेव की जय' असे म्हणत केली. खरं तर ही पोट निवडणूक मुक्ताताई यांच्या दुःखद निधन झाल्याने लागलेली आहे. एक प्रकारे कसब्यामध्ये हिंदुत्ववादी कसब्याला हरवण्याची जंग विरोधी पक्षांकडून चालू आहे, परंतु कसबा हा राष्ट्र विचाराने प्रेरित आहे. यात कसब्यानेच राष्ट्राच्या विचारातून स्वातंत्र्य विचार दिलेला आहे. त्यामुळे इथली जनता ही कमळाला मतदान करेल. हेमंत रासने यांना प्रचंड मताने निवडून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान असल्याचे सुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी हेमंत रासने यांना उद्देशून म्हणाले आहेत.
विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांची घोषणाबाजीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पायी यात्रा काढली. या रॅलीमध्येच पीएमटी बसमधील शाळेचे विद्यार्थीसुद्धा बसलेले होते. त्यांनी रॅली पाहताच मोदी, मोदी अशा घोषणा सुरू केल्या. देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून त्यांना हात उंचावून नारेबाजी केली. या रॅलीत सहभागी असलेले सगळेच कार्यकर्तेसुद्धा मोदी मोदी, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते.