पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना निर्जंतुकिकरण करण्यासाठी दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे येथे सॅनिटायझेशन टनेल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता यवत पोलिसांना ठाण्यात येताना आणि जाताना या सॅनिटायझेशन टनेलमधून जावे लागणार आहे. याचा फायदा यवत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना होणार आहे.
यवत पोलीस ठाण्यात निर्जंतुकिकरणासाठी 'सॅनिटायझेशन टनेल' सुरू
कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पोलीस आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची काळजी घेताना दिसून येत आहेत. परंतु, पोलिसांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी यवत पोलीस ठाण्यात गुरुवारी दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये सॅनिटायझेशन टनेल सुरू करण्यात आले.

यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आर्चिस सेठीया यांनी हे सॅनिटायझेशन टनेल दिले आहे. यावेळी दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.