पुणे -कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शंभरपेक्षा जास्त झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना इफेक्ट: श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर बंद - श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर न्यूज
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शंभरपेक्षा जास्त झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा -CORONA : राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी.. कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ वर, निवडणुकांवरही सावट
पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक देवस्थानांनी मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने यांनी दिली.