महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वासंतिक उटी महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीचा १ कोटी सुवासिक फुलांनी महाअभिषेक - flowers

पुष्पसजावटीमध्ये १३०० किलो झेंडू, २ हजार ३०० किलो मोगरा यांसह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली.

दगडूशेठ गणपती

By

Published : Apr 24, 2019, 4:51 PM IST

Updated : Apr 24, 2019, 6:58 PM IST

पुणे - वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीचा मोगऱ्यांसह १ कोटी सुवासिक फुलांनी महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी हे क्षण मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपले.

दगडूशेठ गणपती मंदिरातील वासंतिक उटी महोत्सव

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, युवराज गाडवे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकारांसह युवा वारकऱ्यांनी देखील मोठया उत्साहाने सहभाग घेतला. श्रींच्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी लावण्यात आले होते.

तब्बल ३०० महिला आणि २५० पुरुष कारागिर यांनी सोमवारपासून पुष्पसजावट केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये १३०० किलो झेंडू, २ हजार ३०० किलो मोगरा यांसह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली. गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्ट्य होते.

Last Updated : Apr 24, 2019, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details