महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सिरम'चे अध्यक्ष सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; तब्येत स्थिर

Cyrus Poonawalla Heart Attack : 'सीरम इन्स्टिट्यूट इंडिया'चे अध्यक्ष (Serum Institute of India) सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic Pune) पुनावाला यांच्यावर ॲंजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याची माहिती आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 8:47 PM IST

Updated : Nov 17, 2023, 9:53 PM IST

पुणे Cyrus Poonawalla Heart Attack : डॉ. सायरस पुनावाला यांना गुरुवारी (16 नोव्हेंबर) हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पहाटे रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ. सायरस पुनावाला यांची डॉ. पुर्वेझ ग्रांट, डॉ. माकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी झाली आहे. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी :डॉ. सायरस पुनावाला यांना 16 नोव्हेंबरला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. 17 तारखेला पहाटे त्यांना रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सध्या पुनावाल यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

पुनावाला यांची प्रकृती स्थिर : या संबंधित रुबी हॉल क्लिनिककडून प्रेस नोट जारी करण्यात आली. डॉ. सायरस पुनावाला यांना 16 नोव्हेंबरला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. तसेच सायरस पूनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी केली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पूनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे, अशी माहिती रुबी हॉलच्या प्रेस नोटद्वारे देण्यात आली होती.

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पुनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहेत. 1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. 'सीरम' दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते. कोरोनावरील लस देखील 'सीरम'ने तयार केली होती. या लसीमुळं भारतातील तसेच इतर देशातील करोडो लोकांचे प्राण वाचले होते.

हेही वाचा -Cyrus Poonawalla On Sharad Pawar : शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी; आता त्यांनी निवृत्ती घ्यावी - सायरस पूनावाला

Last Updated : Nov 17, 2023, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details