पुणे- जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून केळी, आंबा बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली फळे भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा फळबागांना तडाखा; जुन्नरचा आंबा, केळी बागा भुईसपाट - लेटेस्ट न्यूज इन पुणे
सह्याद्रीच्या पर्वत रांगातून चक्रीवादळ खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात धडकले. चक्रीवादळासह पावसाच्या सरी सुरु झाल्या. यामध्ये शेतमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन केळी व आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी दुपारपासून सह्याद्रीच्या पर्वत रांगातून चक्रीवादळ खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात धडकले. चक्रीवादळासह पावसाच्या सरी सुरु झाल्या. यामध्ये शेतमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन केळी व आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
हा आंबा कोकणातला आंबा हंगाम संपल्यावर मुंबई मार्केटला विक्रीसाठी पाठवला जातो. या फळबागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.