पुणे- पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा सायकलवर प्रवास करून एका विद्यार्थिनीने आधुनिक वारी केली आहे. तब्बल 240 किलोमीटरचा पल्ला तिने सायकलवर पार केला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रज्ञा संदीप सावंत, असे या मुलीचे नाव आहे. या वारीत तिने फिट रहा, आणि औषधांना दूर ठेवा, असा संदेश दिला आहे. ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सर करायचे आहे. तसेच तिने कुस्तीमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचे, असे ध्येय ठरवले आहे.
आषाढी वारी : 'फिट रहा, औषधांना दूर ठेवा' संदेश देत प्रज्ञाची पुणे ते पंढरपूर सायकलवारी - प्रज्ञा संदीप सावंत
पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा सायकलवर प्रवास करून एका विद्यार्थिनीने आधुनिक वारी केली आहे.
प्रज्ञा निगडी येथील ज्ञान प्रबोधन नवनगर विद्यालयात शिक्षण घेत आहे. घरात वारीची परंपरा असून प्रज्ञाला ही विठुरायाच्या नामाची गोडी आहे. वारी तर करायची आहे पण ती आधुनिक पद्धतीने, अस प्रज्ञाने ठरवले होते. त्याप्रमाणे तिने तयारी सुरू केली. घरातून देखील आई वनिता यांनी तिला मोलाची साथ दिली. आधुनिक वारीला प्रज्ञाने पहाटे 4 च्या सुमारास सायकलवरून प्रवास सुरु केला. सोबत वडील आणि घरचे इतर 2 व्यक्ती होते. त्यामुळे तिला आणखीच पाठबळ मिळाले.
सकाळ पासून प्रवास संपेपर्यंत पाऊस सुरू होता. त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत प्रज्ञाने सायकलवर प्रवास केला. प्रज्ञाने १९ तास प्रवास करून एका दिवसात तिने पंढरीची वारी पूर्ण केली. विठुरायाकडे तिने सर्वांना निरोगी ठेव, असा आशीर्वाद मागितला.