पुणे- लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने 52 लाख 99 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. हवाई गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. विमानाच्या मागच्या बाजूला वॉश बेसिनच्या मागे टेपने गुंडाळून 14 सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी कोणालाही अटक अथवा ताब्यात घेण्यात आलेले नाही.
दुबई-पुणे विमानातून 52 लाखांचे सोने जप्त, लोहगाव विमानतळावर कारवाई
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने 52 लाख 99 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. हवाई गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. विमानाच्या मागच्या बाजूला वॉश बेसिनच्या मागे टेपने गुंडाळून 14 सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली होती.
या संदर्भात केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवाई गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुबईहून आलेल्या विमानातून सोन्याची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा केंद्रीय सीमा शुल्काने ही कारवाई केली.
विमानाच्या मागच्या बाजूला वॉश बेसिनच्या मागे टेपने गुंडाळून 14 सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली होती. तपासणीमध्ये ही सर्व बिस्किटे परकीय बनावटीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करी प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय सीमाशुल्क विभागाने दिली. दरम्यान ही बिस्कीटे कोणी ठेवली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.