पिंपरी-चिंचवड (पुणे) -शहरातील प्राचीन श्री मोरया गोसावी समाधी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 2 मार्च) भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या परिसरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आल्याने भाविक पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणाहून दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरवर्षी दर्शनासाठी येतात लाखो भाविक
पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिरव मंगलमूर्ती वाडा या परिसरात पोलीस आयुक्तांनी संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरवर्षी अंगारकी चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी होत असते. लाखो भाविक मोरया गोसावी मंदिरात गर्दी करतात.