पुणे- जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन उद्योग, व्यवसाय, बांधकाम काही नियम-अटींच्या नियमावलीत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे आज मजूर अड्ड्यावर कामगारांनी गर्दी केली आहे. गेल्या दिड महिन्यापासून हाताला काम नाही, त्यामुळे खायला अन्न नसल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. काम नसल्यामुळे जगायचे कसे? असा सवालही कामागारांनी उपस्थित केला.
हाताला काम नाही, जगायचं कस? मजूर अड्ड्यावर कामगारांची गर्दी - Corona Virus
व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र सुरू करण्यासाठी नियमावली तयार करून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हाताला काम मिळेल, या आशेने कामगार मजूर अड्ड्यावर येऊन थांबले आहेत.
पुणे व परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच पुणे शहर व परिसराची 3 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र सुरू करण्यासाठी नियमावली तयार करून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हाताला काम मिळेल, या आशेने कामगार कामगार मजूर अड्ड्यावर येऊन थांबले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बांधकाम व्यवसाय सुरू होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल की नाही? अशी शंका कामगार व्यक्त करत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. याचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कामगारांना बसला आहे. हातावर पोट घेऊन दिड महिना कसाबसा काढला. मात्र, सध्या हाताला काम मिळालेच पाहिजे, नाहीतर जगायचे कसं? असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे.