पुणे : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत होती. पुणे शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत जर माहिती घेतली तर वेगवेगळ्या शकली लावून चोरी करतानाचे अनेक प्रकरणे आपण पाहिले आहे. अशीच काहीशी घटना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. हा चोर दारूच्या नशेत गाड्या चोरायचा आणि दारू उतरली की, तो तिथेच गाडी सोडून द्यायचा. अश्या या चोराला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.
08 गुन्हे उघडकीस आणले: या प्रकरणी पोलिसांनी आसिफ अकबर शेख वय ३० वर्षे धंदा व्यवसाय रा. गल्ली नं २१ स्काय रेसिडन्सी ०१ ला मजला, प्लॅट नं. १०१, भाग्योदय नगर, कोंढवा याला अटक केली आहे. त्याचाकडुन चोरीस गेलेले 08 मोटार सायकली 3,60,000 चे जप्त करुन लष्कर पोलीस स्टेशनचे 06 व इतर पोलीस स्टेशनचे 02 गुन्हे असे एकूण 08 गुन्हे उघडकीस आणले आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकिगत: लष्कर पोलीस स्टेशन येथे शसुरज बोराटे, वय २३ वर्षे, धंदा शिक्षण. रा विलास यादव यस्ती गांव काटी, ता. इंदापुर, जि. या फिर्यादीने फिर्याद दिली की, त्यांची हिरो होंडा पेंशन कंपनीची मोटार सायकल क्रमांक MH14Y9248, चासीज नंबर 01J21C344, इंजिन नं. 01J21M17693 सन २००२ चे मॉडेल असलेली गाडी, 28 आणि 29 जानेवारीच्या सुमारास फिर्यादी यांनी तुलसीदास अपमेंटच्या बाहेर रोडवर, कॅम्प, पुणे येथे हॅन्डल लॉक व पार्क केली असता अज्ञात चोरटयाने चोरुन नेली म्हणुन अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिली होती.
सीसीटीव्ही फुटेज तपासले: याबाबतीत पोलिसांनी माहिती दिली की, दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज मधील व रेकॉर्डवरील गुन्हेगार कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रवाना झाल्याचा दिसले. याबाबत आधिक तपास करून सापळा रचून आरोपीच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.