पुणे- देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे देहूगावमध्ये खळबळ उडाली आहे. शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय २५, रा. देहूगाव माळवाडी) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारागृहातून बाहेर येताच देहूगावमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या - dehugaon
गंभीर गुन्ह्यात मृत गुन्हेगार कारागृहात होता. तो नुकताच सुटला होता. त्यामुळे त्याचा पूर्व वैमण्यसातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कारागृहातून बाहेर येताच देहूगावमध्ये गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शंकरच्या कपाळावर, डोक्यात आणि गळ्यावर वार करण्यात आले आहेत. घटनेत शंकरचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.
गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शंकर कारागृहात होता. तो नुकताच सुटला होता. त्यामुळे त्याचा पूर्व वैमण्यसातून खून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते.