पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले असून गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल 961 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
कोविड सेंटर पुन्हा सुरू
पिंपरी-चिंचवड शहरात १ लाखांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असून ९८ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मध्यंतरी कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु, पुन्हा गेल्या चार दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरवर रुजू करणार असल्याचेही पाटील म्हणाले. तसेच नागरिकांना कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे
अन्यथा लॉकडाऊन