पुणे:शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगार परिषदेच्या (Maharashtra Wrestling Council) सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे यांची नियुक्ती कायम असून ती योग्य आहे असा निर्णय आता कोर्टाने दिलेला आहे. परिषदेला राष्ट्रीय कुस्ती संघटनेने ही समिती बरखास्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) आणि त्याचे सहकारी हे कोर्टामध्ये गेले होते.
सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे कायम:त्या अगोदरच महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेची निवडणूक घेऊन नवीन पदाधिकारी नेमले होते. बाळासाहेब लांडगे यांच्या सरचिटणीस पदी नाहीत असे सांगण्यात आले होते त्याविरोधात भारतीय कुस्ती महासंघाला हा अधिकार नाही तर तो अधिकार धर्मदायला आहे. ही जी कुस्ती परिषद आहे, ती अयोग्य आहे असे म्हणत बाळासाहेब लांडगे हे कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यावर निकाल दिला असून आता या कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे कायम असतील असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती:महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही कुस्तीकर राष्ट्रीय संघाची संलग्न असलेली संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये मानाची मानले जाणाऱ्या हिंदू केसरी स्पर्धेत ही संघटना आयोजन गेल्या अनेक दिवस करत आहे, परंतु या संघटनेमध्ये काही वाद निर्माण झाला आणि कुस्तीगीर परिषदेने अनिमेतेबद्दलही संघटनेने कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. बाळासाहेब लांडगे यांचीही नियुक्ती रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात आल्या होत्या. भाजपाचे नेते रामदास तडस यांच्या गटाला ही निवडणूक आली होती.
तडस यांच्या गटाला मोठा धक्का: पुण्यात होणाऱ्या केसरी स्पर्धेच्या आयोजनामध्ये कुठली परिषद ही आयोजन करणार यावर सुद्धा वाद निर्माण झाला होता. आम्हीच आयोजक आहोत असे दोन्ही कडून सांगण्यात आले होते, परंतु आता कोर्टाने बाळासाहेब लांडगे कुस्तीकर परिषदेच्या सरचिटणीसपजी कायम राहतील असा निर्णय दिला असल्यामुळे रामदास तडस यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. त्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा: भारतीय कुस्ती महासंघाने घेतलेली निवडणूक आणि निवडलेली समिती ही चुकीची आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात आली आहे. गेले कित्येक वर्षे याचे सरचिटणीस हे बाळासाहेब लांडगे आहेत. बाळासाहेब लांडगे यांनाचा सरचिटणीस म्हणून पुर्ण अधिकार असतील. मुंबई हायकोर्टाने सांगितले रामदास तडस कुठलीही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.