पुणे - शहरात लॉकडाऊन सुरू असतानाही शहरातील काही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. आजपासून शहरातील गुरुवार पेठ, कसबा पेठ, भवानी पेठांमध्ये पूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशारा खडक पोलिसांनी दिलाय.
संचारबंदीत घराबाहेर पडल्यास कडक कारवाई, पोलिसांचा इशारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या काळात नागरिकांनी घरातच राहावे. घराबाहेर पडू नये. अन्यथा, कारवाई करावी लागेल, असा इशारा खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिलाय.
कोरोना
खडक पोलीस स्टेशन परिसरात काही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने या भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या काळात नागरिकांनी घरातच राहावे. घराबाहेर पडू नये. अन्यथा, कारवाई करावी लागेल, असा इशारा खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिलाय. आतापर्यंत नागरिकांनी सहकार्य केले आहे. या संकाटाच्या काळातही अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Last Updated : Apr 9, 2020, 10:20 AM IST